Latest Posts

View All

फलटणमध्ये स्मार्ट मीटरचा घोळ? मुदतीपूर्वीच वीजबिल कसे तयार होते, नागरिकांमध्ये संभ्रम

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची गैरसोय की तांत्रिक प्रक्रिया? चौकशीची नागरिकांची मागणी. फलटण (जि. सातारा): फलटण शहर…

Read More

जबरी चोरी प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद; मोबाईल, रोख रक्कम व रिक्षा हस्तगत

पुणे, :बिबवेवाडी पोलीसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला…

Read More

बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट; कायदे, सायबर सुरक्षा, वाहतूक नियम व व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन

जनहित प्रतिष्ठानच्या १०५ विद्यार्थ्यांनी घेतला पोलीस कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव; ‘गुड टच-बॅड टच’, व्यसनमुक्ती व सुजाण…

Read More

🚨 पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई; ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे 1.40 कोटींची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद 🚨

  पुणे :पुणे शहरातील सायबर पोलीस स्टेशनकडून मोठी कारवाई करण्यात आली असून, ट्रेडिंग अ‍ॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सायबर पोलीस स्टेशन, पुणे येथे गु.र. नं. 37/2025 अंतर्गत भा.न्या.सं. कलम 316(2), 316(5), 319(2), 318(4), 61(2) तसेच आयटी अ‍ॅक्ट कलम 66(D) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादींना आरोपींनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधून एका बनावट ट्रेडिंग अ‍ॅपवर गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरायला लावून एकूण 1,40,16,315 रुपये इतकी ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. तपासादरम्यान या पैशांपैकी काही रक्कम ही सुशांत हनमंत निकम (वय 38, रा. सातारा) […]

महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथे राष्ट्रध्वजास मानवंदना

  बारामती, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव,’एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, स्वातंत्र सैनिक, नगरसेवक, पत्रकार, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्केट यार्डमध्ये पोलिसांची तत्परता; बेशुद्ध नागरिकाचे प्राण वाचवले 

  पुणे : पुण्यातील मार्केट यार्ड चौक येथे मानवतावादी कार्याची एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. वाहतूक विभागातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे एका नागरिकाचे प्राण वाचले आहेत. आज दुपारी सुमारे 12.20 वाजण्याच्या सुमारास कर्तव्यावर असलेले हेड कॉन्स्टेबल तानाजी राऊत व पोलिस कॉन्स्टेबल दीपक गाडगे यांनी रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीस पाहिले. परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी कोणतीही वेळ न दवडता त्या व्यक्तीस तात्काळ राव नर्सिंग होम, पुणे येथे उपचारासाठी दाखल केले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे संबंधित रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य झाले. दत्तात्रय रणधावे (वय 47 वर्षे, रा. चरोली) असे रुग्णाचे नाव असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत राव नर्सिंग होमचे […]

 पुणे पोलिसांकडून “SAIYAM” अहवाल प्रसिद्ध; युवकांमधील व्यसनाधीनतेच्या धोक्याचे गंभीर चित्र समोर

  पुणे :पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने युवकांमधील वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर आधारित “SAIYAM: The Status of Vulnerability to Addiction” हा महत्त्वपूर्ण अहवाल अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आला आहे. हा अहवाल ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि ज्ञान प्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधन विभागाच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आला आहे. या अहवालाचे प्रकाशन पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी, संशोधक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 2024-25 या शैक्षणिक वर्षात करण्यात आलेल्या या अभ्यासात 13 ते 22 वयोगटातील 1887 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच पालक, शिक्षक, समुपदेशक, डॉक्टर आणि सामाजिक तज्ज्ञ अशा 77 जणांच्या अनुभवांचाही समावेश करण्यात आला […]

पुणे पोलिसांकडून “तक्रार निवारण दिन” जाहीर; 25 एप्रिल रोजी नागरिकांच्या समस्यांवर थेट सुनावणी.

  पुणे :पुणे शहर पोलिसांकडून नागरिकांच्या तक्रारी जलदगतीने सोडवण्यासाठी “तक्रार निवारण दिन” आयोजित करण्यात आला आहे. मा. पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार असून, शहरातील सर्व प्रादेशिक अपर पोलीस आयुक्त, परिमंडळीय पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित राहणार आहेत. दिनांक 25 एप्रिल 2026 (शनिवार) रोजी सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी संबंधित विभागातील अधिकारी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे तत्काळ निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. परिमंडळनिहाय विविध पोलीस ठाण्यांमध्ये अधिकारी हजर राहून नागरिकांच्या समस्या सोडवतील. ज्या ठिकाणी सहाय्यक पोलीस […]

 कात्रज घाटात भीषण अपघात; एसटी बस–रिक्षा धडक, चालक ठार, तिघे गंभीर जखमी

  पुणे :पुणे शहरातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:25 वाजण्याच्या सुमारास कात्रज घाट बोगदा पार करून पुण्याकडे येताना दुसऱ्या वळणावर भीषण अपघात घडला. एसटी बस (MH 10 DT 2697) आणि ऑटो रिक्षा (MH 12 GS 9695) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षामधील चार जण जखमी झाले. जखमींना तातडीने 108 ॲम्बुलन्सद्वारे जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, रिक्षा चालक हनुमंत रमेश हंगरगे (वय 42, रा. सुखसागर नगर, बिबवेवाडी) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेले प्रवासी पुढीलप्रमाणे आहेत: राजेश इंगवले (वय 48, रा. गोकुळ नगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) दशरथ निरगुडे (वय […]

🚨 मॅट्रिमोनियल वेबसाईटवर फेक प्रोफाईल अकाउंट बनवून महिलांची फसवणूक करणाऱ्या तोतया इसमाचा पर्दाफाश 🚨

पुणे :मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मवर स्वतःला सायंटिस्ट असल्याचे भासवून फेक प्रोफाईल अकाउंट तयार करून फिर्यादी महिलांना लग्नासाठी मागणी घालत तसेच त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार असल्याचे सांगून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून लोन घेण्यास भाग पाडून एकूण 26,50,000/- रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आदर्श प्रशांत म्हात्रे, वय 34 वर्षे (उर्फ स्वप्नील वारुळे उर्फ हेमंत गायकवाड उर्फ जयेश पाटील) रा. अलीबाग, जि. रायगड तसेच तुर्भे, रसायणी, पनवेल याच्याविरुद्ध दिनांक 10/01/2026 रोजी गु.र. नं. 26/2026 भा.न्या.सं. कलम 318(4), 319(2) तसेच आयटी अॅक्ट कलम 66(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दाखल गुन्ह्यातील आरोपीचा तत्काळ शोध […]

तडीपार आरोपीचा बिबवेवाडी परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न; धारदार शस्त्रासह पोलिसांच्या जाळ्यात.

  पुणे : पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात तडीपार करण्यात आलेल्या एका आरोपीने पुन्हा प्रवेश करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गु.र.नं. 81/2026 अन्वये आर्म्स अ‍ॅक्ट कलम 4(25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142, 37(1)(2)(3), 135 तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ताऊ उर्फ अविनाश अर्जुन जोगन (वय 28, रा. गल्ली नं. 16, शेळके वस्ती, अपर बिबवेवाडी, पुणे) यास मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-05, पुणे शहर यांच्या आदेश क्रमांक 59/2025 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56(1)(अ)(ब) अंतर्गत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतून […]

 मांजरी (पुणे) येथे दोन इसम शस्त्रांसह जेरबंद; विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांची मोठी कारवाई 

  पुणे : मांजरी, पुणे येथे पोलिसांनी विशेष शस्त्रविरोधी मोहिमेदरम्यान दोन इसमांना धारदार शस्त्रांसह जेरबंद केले आहे. दिनांक 18/04/2026 ते 24/04/2026 या कालावधीत पुणे शहर पोलिसांकडून अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक गौरव देव व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, प्रणवराज यादव आणि त्याचा साथीदार जय शेलार हे दोघेही धारदार शस्त्रांसह मांजरी ग्रीन अ‍ॅनेक्स बिल्डिंग (फ्लॅट नं. 405) येथे थांबले आहेत. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली. दिनांक 19/04/2026 रोजी सुमारे दुपारी 2:05 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सदर […]

बारामतीचा “आक्का” टक्केवारीच्या राजकारणात अडकला? अजितदादांनंतर सुनित्रा वहिनींच्या प्रचारात खोडा की सूडाचा खेळ सुरू? 

  बारामती : बारामतीच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली असून, अजितदादांच्या जाण्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच अंतर्गत समीकरणं बदलताना दिसत आहेत. सुनित्रा वहिनींच्या निवडणूक प्रचारात अपेक्षित वेग दिसत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्या लोकांनी पुढाकार घेऊन प्रचाराची धुरा सांभाळायला हवी होती, तेच आता मागे पडताना दिसत आहेत का? की काही जण जाणीवपूर्वक प्रचाराला दुय्यम स्थान देत स्वतःच्या राजकीय गणितात गुंतले आहेत?कार्यकर्त्यांमध्ये यावर जोरदार चर्चा सुरू आहे.? विशेष म्हणजे, अजितदादांच्या नावावर राजकारण करणारे आणि स्वतःला “दादा” म्हणवणारे काही चेहरे सध्या प्रचारापेक्षा वेगळ्याच हालचाली करत असल्याचे बोलले जात आहे का?गटबाजी, अंतर्गत मतभेद आणि सूडबुद्धीचे वातावरण निर्माण होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये […]