पुणे पोलिसांकडून “तक्रार निवारण दिन” जाहीर; 25 एप्रिल रोजी नागरिकांच्या समस्यांवर थेट सुनावणी.

 

पुणे :पुणे शहर पोलिसांकडून नागरिकांच्या तक्रारी जलदगतीने सोडवण्यासाठी “तक्रार निवारण दिन” आयोजित करण्यात आला आहे. मा. पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार असून, शहरातील सर्व प्रादेशिक अपर पोलीस आयुक्त, परिमंडळीय पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित राहणार आहेत.

दिनांक 25 एप्रिल 2026 (शनिवार) रोजी सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी संबंधित विभागातील अधिकारी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे तत्काळ निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

परिमंडळनिहाय विविध पोलीस ठाण्यांमध्ये अधिकारी हजर राहून नागरिकांच्या समस्या सोडवतील. ज्या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपायुक्त उपस्थित राहू शकणार नाहीत, त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तक्रार निवारण प्रक्रिया पूर्ण करतील.

🔽 तक्रार निवारण दिनासाठी निवडलेली प्रमुख पोलीस ठाणे :

फरासखाना पोलीस स्टेशन
समर्थ पोलीस स्टेशन
आंबेगाव पोलीस स्टेशन
विश्रामबाग पोलीस स्टेशन
डेक्कन पोलीस स्टेशन
नांदेड सिटी पोलीस स्टेशन
स्वारगेट पोलीस स्टेशन
बाणेर पोलीस स्टेशन
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन
बंडगार्डन पोलीस स्टेशन
कोथरूड पोलीस स्टेशन
हडपसर पोलीस स्टेशन
सिंहगड रोड पोलीस स्टेशन
वाघोली पोलीस स्टेशन
खडकी पोलीस स्टेशन
चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन
विमानतळ पोलीस स्टेशन
येवडा (येरवडा) पोलीस स्टेशन
लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन
वानवडी पोलीस स्टेशन
लष्कर पोलीस स्टेशन
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन
कोंढवा पोलीस स्टेशन
काळेपडळ पोलीस स्टेशन
मांजरी पोलीस स्टेशन

पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित आहेत किंवा काही समस्या मांडायच्या आहेत त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *