बारामती तालुक्यातील मौजे रुई बयाजीनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 23 वर्षीय तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात खडकवासला (पुणे) येथील तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींपैकी एक आरोपी तरुणीचे वडील हे पुणे शहरात सहायक पोलीस निरीक्षक (API) पदावर कार्यरत असल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मयत विक्रम उर्फ बबलु नवनाथ कोळपे (वय 23, रा. बयाजीनगर, रुई, ता. बारामती, जि. पुणे) याने दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते 7.45 या वेळेत आपल्या राहत्या घरातील किचनरूममध्ये स्लॅबला असलेल्या लोखंडी हुकाला […]
Category: ताज्या बातम्या
शिरसुफळच्या विकासाचा नवा अध्याय: ॲड. पोपटराव सुर्यवंशी यांचा ‘परिवर्तनाचा लढा’
प्रतिनिधी बारामती: राजकारणात जेव्हा एखादा सुशिक्षित आणि जमिनीवरचा कार्यकर्ता उतरतो, तेव्हा बदलाची नांदी सुरू होते. बारामती पंचायत समितीच्या २०२६ च्या निवडणुकीत ‘शिरसुफळ गणा’तून असाच एक आश्वासक चेहरा समोर आला आहे, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार ॲड. पोपटराव सुरेश सुर्यवंशी. “कुणीतरी येऊन बदल घडवेल याची वाट पाहण्यापेक्षा, स्वतः बदलाचा भाग व्हा” हा मंत्र घेऊन सुर्यवंशी यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. त्यांचा हा लढा केवळ सत्तेसाठी नसून, शिरसुफळच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सामान्यांच्या हितासाठी आहे. ॲड. पोपटराव सुर्यवंशी यांनी आपल्या जाहीरनाम्यात शिरसुफळच्या मूलभूत गरजांना केंद्रस्थानी ठेवले आहे. सध्या ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर असतो, त्यावर उपाय म्हणून त्यांनी […]
भाजपवर मोठी नामुष्की ! चौफेर टीका होताच राजीनामा; अवघ्या 24 तासांत चक्रं फिरली
बदलापूर येथील शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना भाजपनं स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली होती. यानंतर भाजपवर चहूबाजूंनी टीका झाली. दोन वर्षांपूर्वी राज्याला हादरवणाऱ्या बदलापूर शहरातील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. आपटे त्या प्रकरणातील सहआरोपी आहेत. जामिनावर सुटका झालेल्या आपटेला स्वीकृत नगरसेवक पदी संधी दिल्यानं भाजपवर टीका झाली. यानंतर आपटे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर आपटे यांनी राजीनामा दिला. टीव्ही ९ मराठीनं सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत शुक्रवारी झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत भाजपच्या दोन, शिवसेनेच्या दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याची निवड करण्यात आली. शुक्रवारी नवीन प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात […]
मुख्यमंत्री बळीराजा शेत,पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवा-वैभव नावडकर
बारामती, : मुख्यमंत्री बळीराजा शेत,पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता ग्राम पातळीवर सभा घेऊन योजनेकरिता प्रोत्साहित करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना बारामती व इंदापुर तालुक्यात राबविण्याच्या अनुषंगाने कवीवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे गुरुवारी (दि.8) कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी तहसीलदार स्वप्नील रावडे, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी व भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक, नायब तहसीलदार,सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. श्री. नावडकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्र. लवेसू-2025/प्र.क्र.458/भूमापन / (ल-1) दि. 29 ऑगस्ट 2025 अन्वये ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे […]
सिद्धेश्वर यात्रा व महापालिका निवडणूक मुळे 13 ते 16 जानेवारी या कालावधीत सोलापूर महापालिका हद्दीत मद्य विक्रीस मनाई
सोलापूर:- सोलापूर शहरातील दरवर्षी होणाऱ्या ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा व निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच सोलापूर शहरातील महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.) यांनी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 चे कलम 142 (1) अन्वये, 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सोलापूर शहरातील, तसेच अनुक्रमे 14,15 व 16 जानेवारी रोजी निवडणूकीच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व देशी, विदेशी मद्यविक्री व ताडी विक्री अनुज्ञप्ती बंद राहतील असे आदेश दिले आहेत. कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी :- • दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सिध्देश्वर यात्रे निमित्त सोलापूर शहरामध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद, • […]
महाराष्ट्र सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश
सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, यांचेमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 ही दि.11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वा. ते 12 वा. या वेळेत सोलापूर शहरातील खाली नमुद १४ परीक्षा उपकेंद्रांवर होणार आहे. सदर परीक्षा कालावधीत सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स सेंटर, फॅक्स, ईमेल, रेडिओ, इंटरनेट अशा दळणवळण सुविधा यांचा परीक्षेच्या अनुषंगाने गैरवापर होण्याची शक्यता आहे, अशा सुविधा कार्यरत ठेवणे, वायरलेस सेट, ट्रांझिटर, मोबाईल फोन, टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, संगणक गणनायंत्र (कॅल्क्युलेटर), ई-मेल, इंटरनेट, झेरॉक्स सेंटर यासारख्या दळणवळण साधनांचा परीक्षा केंद्राच्या आवारात उपयोग केला जातो. तसेच परीक्षा प्रक्रियेशी संबंधीत नसलेली व्यक्तीं परीक्षा केंद्राच्या आवारात प्रवेश करणे. तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात […]
तपासातील त्रुटी व पुराव्यांच्या अभावामुळे रोहित बनकर निर्दोष; बारामती न्यायालयाचा निकाल
बारामती -: बारामती येथील मे. पुजारीसो कोर्ट यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात IPC कलम 354, 354(A), 354(B), 325, 294, 323, 504 व 506 अंतर्गत दाखल फौजदारी प्रकरणात आरोपी श्री. रोहित आत्माराम बनकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे फिर्यादीकडून आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. मात्र न्यायालयीन सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेकडून झालेल्या त्रुटी, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तसेच अभियोजन पक्षाकडून आरोप शंकातीत सिद्ध करण्यात आले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट नमूद केले की, फौजदारी प्रकरणात संशयावर दोषारोप होऊ शकत नाही आणि आरोपीविरुद्ध ठोस, विश्वासार्ह व सुसंगत पुरावे सादर होणे आवश्यक असते. सदर प्रकरणात ते अपयशी […]
विद्यार्थ्यांनी जी. डी. सी. ॲन्ड ए. व सी. एच. एम, परिक्षेसाठी 23 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत
सोलापूर:- शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी. डी. सी. अॅन्ड ए बोर्ड) यांचेकडून घेण्यात येणारी (जी. डी. सी. अॅन्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी. एच. एम.) परिक्षा दिनांक 26, 27 व 28 में 2026 रोजी घेण्यात येणार आहे. परिक्षार्थीकडून ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परिक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in करण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करायचा आहे. परिक्षार्थीसाठी लागणारी आवश्यक अर्हत्ता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे, शुल्क, परिक्षेच्या अटी व नियम, सूट व इतर तपशीलासाठी सविस्तर अधिसुचना खात्याच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दिनांक 09 जानेवारी 2026 ते 23 […]
अपहरण केलं, मध्यरात्री सुनसान जागेवर नेऊन विवस्त्र केलं अन्… पुण्यातील भयंकर प्रकार समोर
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात ही भयावह घटना घडली. पीडित तरुण वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत आहे आणि तो कोंढवा भागात राहतो. आरोपी हे त्याचे ओळखीचे असून, आर्थिक देवाणघेवाणीतून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा वाद चिघळल्याने ३१ डिसेंबरच्या रात्री सुमारे ११ वाजता आरोपींनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. आरोपींनी त्याला गोकुळनगरजवळील एका शांत आणि मोकळ्या मैदानात नेले. तिथे त्याला पहिले पूर्णपणे विवस्त्र केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि क्रूरपणे मारहाण केली. या संपूर्ण प्रकाराचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. शिवाय शिवीगाळ करताना मंगेश माने याने कारमधील पिस्तुलाचा धाक दाखवला. पीडिताने पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची […]
