तडीपार आरोपीचा बिबवेवाडी परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न; धारदार शस्त्रासह पोलिसांच्या जाळ्यात.

 

पुणे : पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात तडीपार करण्यात आलेल्या एका आरोपीने पुन्हा प्रवेश करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गु.र.नं. 81/2026 अन्वये आर्म्स अ‍ॅक्ट कलम 4(25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142, 37(1)(2)(3), 135 तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी ताऊ उर्फ अविनाश अर्जुन जोगन (वय 28, रा. गल्ली नं. 16, शेळके वस्ती, अपर बिबवेवाडी, पुणे) यास मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-05, पुणे शहर यांच्या आदेश क्रमांक 59/2025 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56(1)(अ)(ब) अंतर्गत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतून दिनांक 14/10/2025 पासून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.

मात्र, संबंधित आरोपीने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा बिबवेवाडी परिसरात प्रवेश केला. त्याच्याकडे धारदार शस्त्र असून तो ते फिरवत परिसरात दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

दिनांक 16/04/2026 रोजी पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना शेळके वस्ती, अपर बिबवेवाडी येथे आरोपी दिसून आला. त्यावेळी त्याच्या हातात धारदार शस्त्र होते आणि तो परिसरात दहशत पसरवत असल्याचे आढळले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने तडीपार आदेशाचे उल्लंघन करून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पुणे शहरात प्रवेश केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंडे यांच्या सूचनेनुसार तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल भुवड तसेच पोलीस अंमलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव, सुमित ताकपेरे, रक्षित काळे, शिवाजी येवले, ज्योतीष काळे व दत्ता शेंडे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *