पुणे :पुणे शहरातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:25 वाजण्याच्या सुमारास कात्रज घाट बोगदा पार करून पुण्याकडे येताना दुसऱ्या वळणावर भीषण अपघात घडला. एसटी बस (MH 10 DT 2697) आणि ऑटो रिक्षा (MH 12 GS 9695) यांच्यात जोरदार धडक झाली.
या अपघातात रिक्षामधील चार जण जखमी झाले. जखमींना तातडीने 108 ॲम्बुलन्सद्वारे जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, रिक्षा
चालक हनुमंत रमेश हंगरगे (वय 42, रा. सुखसागर नगर, बिबवेवाडी) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेले प्रवासी पुढीलप्रमाणे आहेत:
राजेश इंगवले (वय 48, रा. गोकुळ नगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे)
दशरथ निरगुडे (वय 43, रा. अप्पर बिबवेवाडी, पुणे)
शहाजी लक्ष्मण शिवदे (वय 41, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे)
दरम्यान, संबंधित एसटी बस स्वारगेट येथून विटा (जि. सांगली)कडे जात होती, तर रिक्षा खेड शिवापूरकडून स्वारगेटच्या दिशेने येत होते.

या प्रकरणी बस चालक जालिंदर विष्णु शिंदे (वय 53, रा. शेडगेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आंबेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
👉 या भीषण अपघातामुळे कात्रज घाट परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
