जबरी चोरी प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद; मोबाईल, रोख रक्कम व रिक्षा हस्तगत

पुणे, :बिबवेवाडी पोलीसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १२ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास गुरुगौतम मुनी हॉस्पिटलसमोर, बिबवेवाडी येथे फिर्यादी हे रिक्षातून जात असताना दोन पांढऱ्या रंगाच्या दुचाकींवरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांची रिक्षा अडवून त्यांना जबरदस्तीने बाहेर ओढले.

त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम व रिक्षा जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), १२६(२), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार सुमित ताकपे व रक्षित काळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना गंगाधाम रोड, आईमाता मंदिराजवळ, बिबवेवाडी परिसरातून ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
किरण एडवा झांबाडे (वय २०, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे)
पंकज सुभाष पवार (वय २१, रा. शाहू वसाहत, अनिता वॉशिंग सेंटर मागे, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे)
कुमार बाळकृष्ण खुडे (वय ३०, रा. जागडे चाळ, गॅस गोदामजवळ, अपर बिबवेवाडी, पुणे)चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून जबरी चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तसेच पोलीस अंमलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव, सुमित ताकपे, रक्षित काळे, आशीष गायकवाड, शिवाजी येवले, राहुल खाडे, ज्योतिष काळे, संतोष बनसुडे, महेश गिरी आणि दत्ता भेंडे यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *