बारामती -: बारामती येथील मे. पुजारीसो कोर्ट यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात IPC कलम 354, 354(A), 354(B), 325, 294, 323, 504 व 506 अंतर्गत दाखल फौजदारी प्रकरणात आरोपी श्री. रोहित आत्माराम बनकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे फिर्यादीकडून आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. मात्र न्यायालयीन सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेकडून झालेल्या त्रुटी, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तसेच अभियोजन पक्षाकडून आरोप शंकातीत सिद्ध करण्यात आले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट नमूद केले की, फौजदारी प्रकरणात संशयावर दोषारोप होऊ शकत नाही आणि आरोपीविरुद्ध ठोस, विश्वासार्ह व सुसंगत पुरावे सादर होणे आवश्यक असते. सदर प्रकरणात ते अपयशी […]
कोयत्याचा वार करत प्रेमी युगलाला लुटणारा आरोपी अखेर ‘जेरबंद
_तांदुळवाडी एलसी लेक परिसरातील घटना; बारामती पोलिसांचा सापळा ठरला भारी_ बारामती दि. १६ -:…
वाघोलीत एमडी ड्रग्सवर मोठी कारवाई; दोघे अटकेत – 31 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त.
वाघोली : वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून एमडी…
🚨 काळेपडळ पोलीस स्टेशनची मोठी कारवाई; बेकायदेशीर गॅस साठा व काळाबाजार उघड – 103 सिलेंडरसह आरोपी अटकेत 🚨
पुणे : काळेपडळ पोलीस स्टेशनच्या पथकाने बेकायदेशीर गॅस साठा व काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मोठी कारवाई…
विद्यार्थ्यांनी जी. डी. सी. ॲन्ड ए. व सी. एच. एम, परिक्षेसाठी 23 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत
सोलापूर:- शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी. डी. सी. अॅन्ड ए बोर्ड) यांचेकडून घेण्यात येणारी (जी. डी. सी. अॅन्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी. एच. एम.) परिक्षा दिनांक 26, 27 व 28 में 2026 रोजी घेण्यात येणार आहे. परिक्षार्थीकडून ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परिक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in करण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करायचा आहे. परिक्षार्थीसाठी लागणारी आवश्यक अर्हत्ता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे, शुल्क, परिक्षेच्या अटी व नियम, सूट व इतर तपशीलासाठी सविस्तर अधिसुचना खात्याच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दिनांक 09 जानेवारी 2026 ते 23 […]
अपहरण केलं, मध्यरात्री सुनसान जागेवर नेऊन विवस्त्र केलं अन्… पुण्यातील भयंकर प्रकार समोर
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात ही भयावह घटना घडली. पीडित तरुण वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत आहे आणि तो कोंढवा भागात राहतो. आरोपी हे त्याचे ओळखीचे असून, आर्थिक देवाणघेवाणीतून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा वाद चिघळल्याने ३१ डिसेंबरच्या रात्री सुमारे ११ वाजता आरोपींनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. आरोपींनी त्याला गोकुळनगरजवळील एका शांत आणि मोकळ्या मैदानात नेले. तिथे त्याला पहिले पूर्णपणे विवस्त्र केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि क्रूरपणे मारहाण केली. या संपूर्ण प्रकाराचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. शिवाय शिवीगाळ करताना मंगेश माने याने कारमधील पिस्तुलाचा धाक दाखवला. पीडिताने पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची […]

