पुणे :पुणे शहरातील अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल २२ किलो गांजा जप्त करण्यात आला असून एकूण ९,७४,९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०५ यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत होती. त्यानुसार २९ एप्रिल २०२६ रोजी परिमंडळ ०५ पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, कोंढवा परिसरातील शिवनेरीनगर, गल्लीनं. ३० येथे एक महिला व एक पुरुष गांजाची विक्री करत आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. या कारवाईत
यास्मीन करीम शेख (वय ४५ वर्षे)
आमिर समीर शेख (वय १९ वर्षे)
यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळून २१.१९८ किलो गांजा, रोख रक्कम, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ९,७४,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ३२८/२०२६ नोंद करण्यात आला असून एन.डी.पी.एस. कायद्यानुसार कलम ८(क), २०(ब)(ii)(क) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप, कोंढवा पोलीस ठाणे करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ०५ पथक व कोंढवा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या केली.
