मार्केट यार्डमध्ये पोलिसांची तत्परता; बेशुद्ध नागरिकाचे प्राण वाचवले 

 

पुणे : पुण्यातील मार्केट यार्ड चौक येथे मानवतावादी कार्याची एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. वाहतूक विभागातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे एका नागरिकाचे प्राण वाचले आहेत.

आज दुपारी सुमारे 12.20 वाजण्याच्या सुमारास कर्तव्यावर असलेले हेड कॉन्स्टेबल तानाजी राऊत व पोलिस कॉन्स्टेबल दीपक गाडगे यांनी रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीस पाहिले. परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी कोणतीही वेळ न दवडता त्या व्यक्तीस तात्काळ राव नर्सिंग होम, पुणे येथे उपचारासाठी दाखल केले.

वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे संबंधित रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य झाले. दत्तात्रय रणधावे (वय 47 वर्षे, रा. चरोली) असे रुग्णाचे नाव असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत राव नर्सिंग होमचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक करत सांगितले की, “वेळेवर दिलेल्या मदतीमुळे रुग्णाचा जीव वाचला.”

या घटनेनंतर दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. — पुणे शहर वाहतूक शाखा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *