बारामती : बारामतीच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली असून, अजितदादांच्या जाण्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच अंतर्गत समीकरणं बदलताना दिसत आहेत. सुनित्रा वहिनींच्या निवडणूक प्रचारात अपेक्षित वेग दिसत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
ज्या लोकांनी पुढाकार घेऊन प्रचाराची धुरा सांभाळायला हवी होती, तेच आता मागे पडताना दिसत आहेत का? की काही जण जाणीवपूर्वक प्रचाराला दुय्यम स्थान देत स्वतःच्या राजकीय गणितात गुंतले आहेत?कार्यकर्त्यांमध्ये यावर जोरदार चर्चा सुरू आहे.?
विशेष म्हणजे, अजितदादांच्या नावावर राजकारण करणारे आणि स्वतःला “दादा” म्हणवणारे काही चेहरे सध्या प्रचारापेक्षा वेगळ्याच हालचाली करत असल्याचे बोलले जात आहे का?गटबाजी, अंतर्गत मतभेद आणि सूडबुद्धीचे वातावरण निर्माण होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढत आहे का?.
दरम्यान, “बारामतीचा आक्का” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही प्रभावी व्यक्तींवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे —
हे सर्व टक्केवारीच्या राजकारणामुळे घडत आहे का?
प्रचारात पूर्ण ताकद न लावता, काहीजण स्वतःचे हितसंबंध साधण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा संशय व्यक्त केला जात आहे.
अजितदादांच्या अनुपस्थितीत एकसंघ राहण्याची गरज असताना, काही जण जुने हिशोब चुकते करण्याच्या भूमिकेत आहेत का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जर ही अंतर्गत अस्थिरता अशीच राहिली, तर त्याचा थेट परिणाम सुनित्रा वहिनींच्या निवडणुकीवर होऊ शकतो. विरोधक याचा फायदा घेण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.
