दोन गावठी बनावटीचे कट्टे व काडतुसे जप्त करून आरोपीस केले जेरबंद

 

सुंदरनगर, मांगडेवाडी परिसरात कारवाई; १.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त, आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल

पुणे -: भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना अंमलदार मितेश चोरमाले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुंदरनगर, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे एक इसम अग्निशस्त्र घेऊन थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

तत्काळ नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सुंदरनगर, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे जाऊन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेतला असता सदर ठिकाणावरील गुरुदत्त मित्र मंडळाचे मंदिरालगतचे मोकळ्या जागेमध्ये इसम नामे सोहम गोविंद धुमाळ, वय १८ वर्षे ७ महिने, रा. पुण्यनगरी सोसायटी, आयप्पा मंदिराजवळ, कृष्णा इन्क्लेव्ह, वडगाव शेरी, पुणे हा त्यांचे ताब्यात १,०१,०००/- रुपये किंमतीचे दोन गावठी बनावटीचे कट्टे व दोन जिवंत काडतुसे मिळून आल्याने त्याचेकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९४/२०२६, आर्म अॅक्ट कलम ३(२५) म.पो. अधि. कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि स्वप्निल पाटील हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परि-२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. कैलास कोडगा यांच्या सूचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमाले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खेमसोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *