पुणे : काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करत तब्बल ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. २४ मे २०२६ रोजी काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन बोले व गिरीराज जगवळे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत माहिती मिळाली. सातवनगर, हांडेवाडी रोड, पुणे येथील गणपती मंदिरामागील मोकळ्या जागेत एक इसम चारचाकी वाहनामध्ये गावठी हातभट्टी दारूचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग […]
Author: lokjagrutibhumi@gmail.com
फरसखाना पोलिसांची मोठी कामगिरी; घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरांना जेरबंद, तब्बल ₹18.44 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे : फरसखाना पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत दोन सराईत आरोपींना अटक करून तब्बल ₹18 लाख 44 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दिनांक 6 मार्च 2026 रोजी कसबा पेठ येथील एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सुमारे 130.300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख ₹50 हजार रुपये असा एकूण ₹11 लाख 7 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी फरसखाना पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता पोलीस हवालदार गजानन सोनुने यांनी संशयित आरोपींची ओळख पटवली. आरोपी […]
पुण्यातील बहुचर्चित अल्पवयीन मुलीवरील कथित गँगरेप प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष
तब्बल सहा वर्षांनंतर पुणे सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; पुराव्याअभावी पाचही आरोपींची मुक्तता *पुणे | प्रतिनिधी* पुण्यात 2020 साली दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीवरील कथित गँगरेप व पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यात पुणे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्रीमती शिरभाते यांनी दिनांक 08 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण निकाल देत सर्व पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण पुणे शहरासह राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सदर प्रकरणात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 363, 366(A), 376(3)(N), 376(D), 376(DA), 323 तसेच Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act, 2012 अंतर्गत कलम 4, 6, 8 व 12 अन्वये गंभीर आरोप […]
हडपसर पोलिस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपींना 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
पुणे -: हडपसर पोलिस ठाणे गु.र.नं. 753/2018 अन्वये भा.दं.वि. कलम 307, 323, 504, 506, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) अंतर्गत दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी अमोल बाळासाहेब बोरकर (वय 33, रा. काळे कॉम्प्लेक्स बिल्डिंग, काळेपडळ, पुणे) व सागर विजय काळे (वय 33) यांनी संशयाच्या कारणावरून प्रतीक सकपाळ याला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक श्री. दिलीप गाडे (सध्या नियुक्ती – लातूर ग्रामीण) यांनी […]
OLX वर टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने Royal Enfield चोरी; विमानतळ पोलिसांची कारवाई
पुणे : विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या हद्दीत OLX वर विक्रीसाठी टाकलेल्या दुचाकीची टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दि. 14 मार्च 2026 रोजी फिर्यादी यांनी विमानतळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. फिर्यादी यांनी त्यांची Royal Enfield कंपनीची Meteor 350 ही दुचाकी OLX वर विक्रीसाठी पोस्ट केली होती. त्यानंतर दि. 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास “इशिता माथुर” नावाच्या व्यक्तीने गाडी खरेदीत रस असल्याचे सांगून संपर्क साधला. त्यानंतर एक इसम गाडी पाहण्यासाठी आला व टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने दुचाकी घेऊन फरार झाला. याप्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर […]
पुणे गुन्हे शाखा युनिट 6 ची कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह आरोपी अटकेत
पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 6 कडून मोठी कारवाई करण्यात आली असून एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दिनांक 05 मे 2026 रोजी युनिट 6 कडील पोलिस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी समांतर रात्री पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार शेखर काटे व तानाजी देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. साहिल शाम नरळकर (वय 25 वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, मंगलमूर्ती हाउसिंग सोसायटी, भोसरी, पुणे) हा इसम गंगानगर, फुरसुंगी परिसरात फिरत असून त्याच्याकडे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. संशयित इसमाला ताब्यात घेऊन […]
प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित
बारामती- महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् च्यावतीने देण्यात येणारा “प्राइड ऑफ महाराष्ट्र-पत्रकार” पुरस्कार दैनिक संध्याचे बारामती तालुका प्रतिनिधी कृष्णमुर्ती जगताप यांना देण्यात आला.महाराष्ट्र दिन/कामगार दिन व मराठी राजभाषा दिनानिमित्त सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे उपमुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्ष बारामती शहर कक्षप्रमुख, दैनिक संध्या/संध्या लाईव्ह/MCN न्युज मराठी चे बारामती तालुका प्रतिनिधी,पत्रकार श्री.कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना प्राइड ऑफ महाराष्ट्र – पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तृप्ती देसाई (संस्थापक अध्यक्षा-भुमाता ब्रिगेड,महाराष्ट्र राज्य),प्रा.दत्तात्रय कोबाराने,सत्यवान लांडगे,आदम सय्यद यांच्या शुभहस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सांस्कृतिक कला रंगमंदीर,एयरपोर्ट रोड,पुणे येथे कार्यक्रम […]
बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा लावत आरोपी जेरबंद, चार गुन्ह्यांचा उलगडा.
बारामती :बारामती शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी बजावली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 0166/2026, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार श्री. यशवंत पवार (तपासी अंमलदार) यांना गोपनीय बातमीदारामार्फत अशी खात्रीशीर माहिती मिळाली की, एक इसम चोरीच्या मोटारसायकली वापरत असून त्या विविध ठिकाणी लपवून ठेवत आहे. या माहितीची पडताळणी करून तात्काळ कारवाई करण्यात आली व सापळा रचून आरोपी नामे ऋषिकेश पिंटू मंडले (रा. निरजणी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याच्यासोबत एका अल्पवयीन […]
🚨 मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक; 43 मोबाईल जप्त, 2.65 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 🚨
पुणे -: येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत सायाद्री हॉस्पिटल समोर गल्लीत एका इसमाने रात्रीचे जेवण झाल्यानंतर मोबाईल फोन पाहत असताना दोन अज्ञात इसमांनी मागून येऊन त्याच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून चोरी करून पळ काढला. याप्रकरणी दिनांक 29/04/2026 रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 213/2026 भारतीय न्याय संहिता कलम 304, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 04 श्री. चिलुमुला रजनीकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. सुनील जेतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक कार्यरत झाले. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की […]
पुण्यात मोठी कारवाई! गांजाच्या विक्रीत गुंतलेल्या दोन आरोपींना अटक; २२ किलो गांजा जप्त
पुणे :पुणे शहरातील अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल २२ किलो गांजा जप्त करण्यात आला असून एकूण ९,७४,९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०५ यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत होती. त्यानुसार २९ एप्रिल २०२६ रोजी परिमंडळ ०५ पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, कोंढवा परिसरातील शिवनेरीनगर, गल्लीनं. ३० येथे एक महिला व एक पुरुष गांजाची विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. या कारवाईत यास्मीन करीम शेख (वय ४५ वर्षे) आमिर समीर शेख (वय १९ वर्षे) यांना ताब्यात […]
