पुणे गुन्हे शाखा युनिट 6 ची कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह आरोपी अटकेत 

 

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 6 कडून मोठी कारवाई करण्यात आली असून एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

दिनांक 05 मे 2026 रोजी युनिट 6 कडील पोलिस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी समांतर रात्री पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार शेखर काटे व तानाजी देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली.

साहिल शाम नरळकर (वय 25 वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, मंगलमूर्ती हाउसिंग सोसायटी, भोसरी, पुणे) हा इसम गंगानगर, फुरसुंगी परिसरात फिरत असून त्याच्याकडे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचला.

संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 01 गावठी बनावटीचे पिस्तूल व 02 जिवंत काडतुसे असा एकूण 41,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी फुरसुंगी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 183/2026 नुसार आर्म्स अ‍ॅक्ट कलम 3(25) व मुंबई पोलिस अ‍ॅक्ट कलम 37(1)(3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई मा. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलिस उपायुक्त (गुन्हे) श्री. विवेक मासाळ व मा. सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे-2) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड यांच्या सूचनेनुसार पोलिस अंमलदार तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, पल्लवी मोरे, गणेश माने, शेखर काटे व उमेश शेलार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *