हनुमान मंदिर देवस्थान उदापुर येथे हनुमान जयंती उत्सव सोहळ्या प्रित्यर्थ गोपाकाल्याचे आयोजनमो ठ्या उत्साहात झाला संपन्न

ब्रम्हपुरी / प्रतिनिधी : ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापुर येथील हनुमान मंदिर देवस्थान परिसरात गोपाल काल्याचे समारोप कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला.

दि. ०२ एप्रिल २०२६,गुरुवार रोजी झालेल्या.कार्यक्रमाकरीता माजी माजी आमदार अतुल भाऊ देशकर अध्यक्ष म्हणून स्थान भूषवले होते.

त्याचप्रमाणे दीपक भाऊ उराडे, प्रमोद जी बानबले साहेब पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर, प्रकाशजी बगमारे प्रदेश सचिव भाजपा ओबीसी मोर्चा, प्रेमलालजी धोटे, मोरेश्वरची दर्वे निर्मल आफसेट ब्रह्मापुरी, कृष्णा भाऊ सहारे, सिद्धेश्वर जी भर्रे,अनिल जी नागतोडे, राकेश दुनेदार, सुभाष भाऊ नाकतोडे, आलाद जी सिनखेडे यांच्यी विषेश उपस्थिती होती.

ह्या दोन दिवसाच्या कार्यक्रमात किर्तन व प्रवचन कार हरिभक्त परायण काशिनाथजी महाराज व साथ संगत हरिभक्त परायण विठोबा दर्वे, माधुरी दिवटे, संदीप जी ढोरे, गजानन जी शिऊर कार यांच्या मुख कमलातून कीर्तनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर देवस्थान उदापुर व समस्त गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

गोपाल कालच्या निमित्याने गावात दोन दिवसीय समारोप कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तीमय वातावरण निर्माण केले व कार्यक्रमाची शोभा वाढवली._

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *