पुण्यात खूनाच्या कटाचा पर्दाफाश; तीन आरोपींना अटक

 


पुणे : शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत खूनाचा कट रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 144/2026 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 55, 61 तसेच आर्म अ‍ॅक्ट कलम 3(25) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात शेखापूर टोळीतील सदस्यांनी प्रतिस्पर्धी टोळीतील एका व्यक्तीच्या खुनाचा कट रचला होता. त्यासाठी त्यांनी बेकायदेशीर शस्त्रसाठा जमा केला होता.
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-2 ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 13 मार्च 2026 रोजी तिघा आरोपींना अटक करण्यात आली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित मल्लिकार्जुन शेखापूर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. मात्र 2 एप्रिल 2026 रोजी त्याला सोमवारी पेठ परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

तसेच या गुन्ह्यातील दुसरा आरोपी निखिल ज्ञानोबा लगाडे (वय 23, रा. गुलटेकडी, पुणे) यालाही युनिट-5 च्या पथकाने सापळा रचून अटक केली. आणखी एक आरोपी अन्वर ऊर्फ जंबा शाकीर शेख (वय 23) यालाही 3 एप्रिल 2026 रोजी ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोठा आळा बसण्यास मदत होणार आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

खंडणी विरोधी पथक-2, गुन्हे शाखा युनिट-02 व युनिट-05 यांच्या संयुक्त कारवाईतून ही यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *