सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, यांचेमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 ही दि.11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वा. ते 12 वा. या वेळेत सोलापूर शहरातील खाली नमुद १४ परीक्षा उपकेंद्रांवर होणार आहे.
सदर परीक्षा कालावधीत सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स सेंटर, फॅक्स, ईमेल, रेडिओ, इंटरनेट अशा दळणवळण सुविधा यांचा परीक्षेच्या अनुषंगाने गैरवापर होण्याची शक्यता आहे, अशा सुविधा कार्यरत ठेवणे, वायरलेस सेट, ट्रांझिटर, मोबाईल फोन, टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, संगणक गणनायंत्र (कॅल्क्युलेटर), ई-मेल, इंटरनेट, झेरॉक्स सेंटर यासारख्या दळणवळण साधनांचा परीक्षा केंद्राच्या आवारात उपयोग केला जातो. तसेच परीक्षा प्रक्रियेशी संबंधीत नसलेली व्यक्तीं परीक्षा केंद्राच्या आवारात प्रवेश करणे. तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे, परीक्षार्थीना कोणताही अडथळा होऊ नये आणि परीक्षा प्रक्रियेशी संबधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांचे परीक्षेशी संबंधित कर्तव्ये चोखपणे, कोणताही अडथळा अथवा उपद्रव न होता बजावता यावे म्हणून परीक्षा केंद्राच्या सभोवताली १०० मीटर परीसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ चा आदेश लागू करणे निकडीचे असल्याने
पोलीस उप आयुक्त, (गुन्हे/विशा), डॉ. अश्विनी पाटील, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये यांनी आदेश दिला की, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०८.०० वा. ते दुपारी १३.०० वा. पर्यंत पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीचे कार्यक्षेत्रातील खाली नमुद सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्रापासून १०० मीटर परिसरात खालील कृती करण्यास बंदी घालत आहे.
परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे.
परीक्षा केंद्राच्या परिसरात सार्वजनिक शांततेसं बाधा निर्माण होईल असे कृत्य करणे.
. परीक्षा केंद्राचे १०० मीटर परिसरातील झेरॉक्स, फॅक्स सेंटर, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनीक्षेपक, संगणक केंद्र, इंटरनेट कॅफे अशा दळणवळण सुविधा आणि पानपट्टी कार्यरत ठेवणे
परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, सेल्युलर फोन, वायरलेस सेट, ट्रान्झीटर व इतर माध्यमासह प्रवेश करणे, परीक्षा केंद्राचे १०० मीटर परिसरात कोणत्याही वाहनांस प्रवेश करणे, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित नसलेली व्यक्ती (उमेदवारांचे नातेवाईकासह) परीक्षा केंद्राचे १०० मीटर परिसरात प्रवेश करणे.परीक्षा केंद्राचे १०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणे. सदरचा आदेश परीक्षा प्रक्रियेशी संबंधित सर्व शासकीय अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रुंद परीक्षार्थी पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना त्यांचे परीक्षेसंबंधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाही हा आदेश दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत खालील परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात लागू राहील या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्यायसंहिता विषय 23 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे आदेश पोलीस उपयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सोलापूर शहर यांनी दिले आहेत.
परीक्षा केंद्रांची यादी पुढीलप्रमाणे
श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय बाळवेस सोलापूर,
बीएफ दमानी हायस्कूल 194/1 बुधवार पेठ सोलापूर, संभाजीराव शिंदे प्रशाला ९१ मुरारजी पेठ जुनी मिल कंपाऊंड सोलापूर, एस व्ही सी एस हायस्कूल 84 भवानी पेठ सोलापूर , उमाबाई श्राविका हायस्कूल 197 बुधवार पेठ सोलापूर, एस आर चंडक इंग्लिश हायस्कूल बुधवार पेठ सम्राट चौक सोलापूर, सिद्धेश्वर वुमन्स पॉलीटेक्निक भवानी पेठ रुपा भवानी रोड सोलापूर, दयानंद काशिनाथ असावा हायस्कूल 101 बी भवानी पेठ सोलापूर, श्री सिद्धेश्वर बालमंदिर माध्यमिक स्कूल 910 भवानी पेठ सोलापूर, के .एल. ई. अण्णाप्पा काडादी हायस्कूल भवानी पेठ सोलापूर, हिंदुस्तान कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल १६६ रेल्वे लाईन सोलापूर, संगमेश्वर कॉलेज 165 रेल्वे लाईन सोलापूर, जागृती विद्यामंदिर हायस्कूल नेहरूनगर सोलापूर, शांती इंग्लिश मीडियम स्कूल न्यू संतोष नगर सोलापूर.
