एमआयडीसी बारामतीत चोरीच्या दोन घटना उघड.. वेगवेगळ्या वायर कट करून तसेच सोलर केबल कट करून झाल्या होत्या चोऱ्या.. बारामती -: एमआयडीसी बारामती परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी तपास करत उलगडा केला आहे. या कारवाईत अल्पवयीन मुलांसह भंगार व्यावसायिक आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना अटकही करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत डायनामिक्स कंपनीच्या आवारातून १३ मार्च रोजी सोलर प्लांटला जोडलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरीस गेली होती. याबाबत १६ मार्च रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. […]
Category: ताज्या बातम्या
बारामतीत अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार; आरोपी मिलिंद जाधवला ४ वर्षांची सक्तमजुरी
प्रतिनिधी -: भीमराव कांबळे बारामती : अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांवर लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे. मिलिंद मदन जाधव (वय ५०, रा. धोपावे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याने महिलांना “पैशाचा पाऊस पाडतो” असे खोटे आमिष दाखवून अघोरी पूजा आयोजित केली. या पूजेच्या नावाखाली महिलांना विवस्त्र अवस्थेत बसवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले तसेच आर्थिक फसवणूकही करण्यात आली. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 405/2024 नुसार बी.एन.एस. कलम 64, 69, 318(4) तसेच काळी जादू प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत कलम 2(1)(B), 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला […]
साथानकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात ऐतिहासिक निकाल – ९ पोलिसांना फाशी थुथुकुडी (तामिळनाडू)
प्रतिनिधी -: नेहा पवार प्रतिनिधी :देशभरात खळबळ उडवणाऱ्या साथानकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक आणि कठोर निर्णय देत ९ पोलीस कर्मचाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल सहा वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर आलेला हा निकाल देशातील कोठडीतील अत्याचारांविरोधातील एक मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. जून २०२० मध्ये लॉकडाऊनदरम्यान साथानकुलम येथील व्यापारी पी. जयराज (५९) आणि त्यांचा मुलगा बेनिक्स (३१) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. दुकान काही मिनिटे जास्त वेळ उघडे ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. ताब्यात असताना दोघांवर पोलीसांकडून अमानुष छळ करण्यात आला. लाठ्या-काठ्यांनी करण्यात आलेल्या बेदम मारहाणीमुळे ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान बेनिक्सचा २२ जून तर जयराज यांचा २३ […]
पुणे पोलीस आयुक्तालयात “प्रोजेक्ट अस्मिता” उपक्रमाचे आयोजन
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये Divyaj Foundation यांच्या वतीने महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी “प्रोजेक्ट अस्मिता” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी पाषाण येथील संस्कार हॉल येथे दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन Amruta Devendra Fadnavis (अमृता देवेंद्र फडणवीस), संस्थापक – दिव्यज फाउंडेशन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री Prajakta Mali (प्राजक्ता माळी) यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमास पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🎯 दोन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात “प्रोजेक्ट अस्मिता” अंतर्गत ६ एप्रिल […]
मु. पो. वाकी बुद्रुक, तालुका महाड, जिल्हा रायगड “माझं गाव माझं हायस्कूल वाचवा अभियान” परीक्षेच्या तोंडावर महाराष्ट्र शासनाने केली शाळा बंद. मुलांचा भविष्य धोक्यात
मुंबई प्रतिनिधी: महेश कदम महाड -: महाड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत असून गेली पन्नास वर्षे सुरू असलेली शाळा शासनाच्या निर्णयामुळे अचानक बंद करण्यात आली असून या शाळेतील विद्यार्थी आता परीक्षेपासून वंचित राहणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं कारण म्हणजे महाड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय वाकी बुद्रुक येथील शाळा शासनामार्फत बंद करण्यात आली आहे ३१ मार्च रोजी हा शासनाने निर्णय जाहीर केला असून ०१ एप्रिल पासून या शाळेवरती असणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या तालुक्यातील काही शाळांमध्ये करण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या येत्या ११ एप्रिल पासून सुरू होत आहेत […]
हनुमान मंदिर देवस्थान उदापुर येथे हनुमान जयंती उत्सव सोहळ्या प्रित्यर्थ गोपाकाल्याचे आयोजनमो ठ्या उत्साहात झाला संपन्न
ब्रम्हपुरी / प्रतिनिधी : ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापुर येथील हनुमान मंदिर देवस्थान परिसरात गोपाल काल्याचे समारोप कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. दि. ०२ एप्रिल २०२६,गुरुवार रोजी झालेल्या.कार्यक्रमाकरीता माजी माजी आमदार अतुल भाऊ देशकर अध्यक्ष म्हणून स्थान भूषवले होते. त्याचप्रमाणे दीपक भाऊ उराडे, प्रमोद जी बानबले साहेब पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर, प्रकाशजी बगमारे प्रदेश सचिव भाजपा ओबीसी मोर्चा, प्रेमलालजी धोटे, मोरेश्वरची दर्वे निर्मल आफसेट ब्रह्मापुरी, कृष्णा भाऊ सहारे, सिद्धेश्वर जी भर्रे,अनिल जी नागतोडे, राकेश दुनेदार, सुभाष भाऊ नाकतोडे, आलाद जी सिनखेडे यांच्यी विषेश उपस्थिती होती. ह्या दोन दिवसाच्या कार्यक्रमात किर्तन व प्रवचन कार हरिभक्त परायण […]
🚨 धक्कादायक घटना! ‘गोल्डन मॅन’ रोहित पिसाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला 🚨
“ठाण्यात प्राणघातक हल्ला: आरोपींना अटक न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा” ठाणे, ३ एप्रिल २०२६ (प्रतिनिधी):‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळख असलेल्या रोहित पिसाळ यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी काल मध्यरात्री (३ एप्रिल) प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी मांडवी पोलीस स्टेशन, ठाणे येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांकडून विविध दिशांनी तपास केला जात आहे. या घटनेमागील नेमका हेतू काय, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत रिपब्लिकन संघर्ष सेनेचे कार्याध्यक्ष तसेच […]
🚨 नातेपुतेत भीषण अपघात : कालव्यात कार कोसळून तिघांचा मृत्यू, चालक बचावला 🚨
प्रतिनिधी – नेहा पवार नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात फलटणमधील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून फोंडशिरसकडे जाणारी इर्टिगा कार जुन्या पालखी महामार्गावरील निरा उजव्या कालव्याच्या पुलावरून थेट पाण्यात कोसळली. ही घटना पहाटे सुमारे पाचच्या सुमारास घडली. या अपघातात प्रीती टिळेकर, हनुमंत जठार आणि मंजू जठार (सर्व रा. फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला. चालक सुनील टिळेकर हे मात्र सुदैवाने बचावले. या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पुलावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर कारने पुलावरील कठडा तोडत थेट कालव्याच्या खोल पाण्यात झेप घेतली. […]
पुण्यात खूनाच्या कटाचा पर्दाफाश; तीन आरोपींना अटक
पुणे : शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत खूनाचा कट रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 144/2026 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 55, 61 तसेच आर्म अॅक्ट कलम 3(25) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शेखापूर टोळीतील सदस्यांनी प्रतिस्पर्धी टोळीतील एका व्यक्तीच्या खुनाचा कट रचला होता. त्यासाठी त्यांनी बेकायदेशीर शस्त्रसाठा जमा केला होता. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-2 ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 13 मार्च 2026 रोजी तिघा आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित मल्लिकार्जुन शेखापूर हा गुन्हा दाखल […]
दौंड तालुक्यात महिलेवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
वार्ताहर – गौरव जोगदंड दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात आरोपी अमोल काळे (रा. खडकी, ता. दौंड) याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी व अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना मुकादमवाडी, कुरकुंभ (ता. दौंड) येथे घडली. फिर्यादी महिला आपल्या आईकडे जाण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनाची वाट पाहत उभी होती. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या आरोपीने तिला पुण्याला सोडण्याचे आमिष दाखवून गाडीत बसवले. गाडी पुढे नेत असताना आरोपीने महिलेशी अश्लील बोलणे […]
