पुणे : पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ‘पुरस्कार गौरव’च्या नावाखाली सुरु असलेला फसवणुकीचा प्रकार आता उघड उघड आर्थिक लुटीमध्ये परिवर्तित झाला आहे. काही बनावट संस्था व स्वयंघोषित आयोजक व्यापारी, उद्योजक, दुकानदार व सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करून “राष्ट्रीय/राज्यस्तरीय पुरस्कार”, “ब्रँड आयकॉन”, “बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड” अशा मोठ्या पदव्या देण्याचे आमिष दाखवत आहेत. या माध्यमातून संबंधितांकडून “अनामत रक्कम”, “नोंदणी शुल्क”, “इव्हेंट फी” किंवा “प्रोमोशन चार्जेस” या नावाखाली हजारो ते लाखो रुपये उकळले जात आहेत. अनेक प्रकरणांमध्ये पैसे घेतल्यानंतर केवळ बनावट सर्टिफिकेट देऊन औपचारिक कार्यक्रम उरकला जातो, तर काही ठिकाणी आयोजक थेट संपर्क तोडून फरार होतात. ⚖️ भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गंभीर गुन्हा: […]
Category: महाराष्ट्र
११४७ एकर जमीन व्यवहार प्रकरण गाजलं; महसूल मंत्री बावनकुळे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र
फलटण -: राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारे ११४७ एकर शेतीजमीन व्यवहार प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाऊन, पत्नी, मुलगी आणि मुलगा यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात शेतीजमीन खरेदी-विक्री करून ती हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकूण ११४७ एकर जमिनीचा व्यवहार संशयास्पद पद्धतीने झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील माहिती काही पत्रकारांच्या व्हिडिओमधून पुढे आल्यामुळे हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे. या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे विदर्भ प्रदेशाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी थेट राज्य […]
